प्रस्तावना
***प्रिय समाज बंधु-भगिनींनो***,
श्री शुक्ल यजुर्वेदिय गोवर्धन ब्राम्हण मंडळ धुळे संस्थेची स्थापना साधारणतः सन १९७८ रोजी करण्यात आली. या समाजाची प्रथम कार्यकारीणी मंडळाची मिटींग साधारणतः अध्यक्ष
सो. यांच्या घरीच मासिक सभा अगर नियोजन होत असे, आपल्या समाजाच्या दानशुर कै. श्रीमती मनकर्णिका माधवराव भट यांनी समाजास आपल्या स्वतःच्या मालकिच्या
इमारतीचा काही भाग दान केला तर काही भाग समाजाला विकत उपलब्ध करून देवून कायम स्वरूपी जागा उपलब्ध करण्यात सहकार्य करुन जीवनभर अजरामर झाल्या. यामध्ये
समाजाने वेळोवेळी निवडून दिलेल्या प्रत्येक मा. अध्यक्ष व कार्यकारीणी मंडळाने समाजाचे हित जोपासत प्रगतीचा आलेख कायम वर वर नेण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच आज
आपणांस समाजाची मनकर्णिका भवन नावाची वास्तु नावारूपाला दिसत आहे. याकरीता अनेक समाज बांधवांनी खुप मोठे योगदान दिलेले आहेच कारण समाजकार्य हे परमेश्वराचे
कार्य आहे या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला आहेच व यापुढेही करत रहावा हि विनंती. समाज बांधवांनो, समाजाचे नेतृत्व व आपले स्वतःचे कर्तुत्व तेवढेच महत्वाचे आहे,
यापूर्वी अस्तित्वात असलेल्या सर्व अध्यक्ष व कार्यकारीणी मंडळाने संस्था उभारणीकरीता खुप प्रयत्न केले. त्यांच्या कार्याबद्दल मी मन:पुर्वक अभिनंदन व आभार मानतो. कारण
त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करणे मी माझे कर्तव्य समजतो. समाजासाठी अशाच कृतीशिल नेतृत्वाची कायम गरज असते असे मला वाटते आणि असे नेतृत्व प्रत्येक कार्यकारीणी
मंडळाने केलेले दिसत आहे.
२१ वे शतक हे संगणकीय युग आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हाती अँड्रॉइड मोबाईल तसेच लॅपटॉप बाळगत असल्याने प्रत्येक गोष्ट हि कागदपत्रविरहित हाताळत असतो, अश्या
संगणकीय युगात देखील समाजात होत असलेल्या घडामोडी हया नेहमीच ऑनलाईन हाताळता याव्यात याकरीता २० मे २०१८ ते २०२३ या काळातील आपण निवडुन दिलेल्या
कार्यकारिणी मंडळाने अनेक चढ उतार पाहिले व हाताळले यामध्ये सर्वात भयानक म्हणजे कोव्हीड-१९ हा संसर्गिय आजार, यात अनेक संसार उघडे पडले, परंतु याकाळात
मा. अध्यक्ष व कार्यकारिणी मंडळाने समाजातील अत्यंत गरीब समाज बांधवांना साधारणतः १०५ कुटुंबांना एक महिना पुरेल ऐवढा किराणा रुपये २०००/- चा व रोख रक्कम ५००/-
देवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला, याकरीता अनेक समाजबांधवांनी आर्थिक मदतीचा हात देखील दिला. या अश्या संसर्गिय आजारात मात्र घरी राहून देखील काम
करता येऊ शकते याचा प्रत्यय इनफाॅरमेशन टेक्नोलॉजिने सिद्ध केला, याचेच मार्गदर्शन घेवुन आपल्या समाजाचे अध्यक्ष श्री महेश सुभाष मुळे व कार्यकारी मंडळाने विचार करून
आपल्या समाजाची देखील वेब साईट तयार करण्याचा संकल्प केला. याकरीता समाजातील अनेक आय. टी. इंजिनिअर यांच्याशी संपर्क करण्यात येवून समाजाचे
श्री. मोहित जोशी, मनमाड यांनी सहकार्य करण्यास सुरूवात केली व समाजाची वेबसाईट तयार करण्यास सुरूवात झाली. या बेबसाईट मध्ये साधारणत: समाजातील
प्रत्येक परीवाराची संपूर्ण माहिती अद्ययावत करण्यात येवून आज प्रत्येक परीवारास सर्वात मोठी अडचण येते ती म्हणजे मुला-मुलींची विवाह जमवितांना, कोणतेही सहकार्य मिळत
नसल्या कारणाने कुठे अविवाहीत मुले-मुली आहेत याची माहिती मिळत नसल्याने आपणांस इतर शाखेत देखील मुलामुलीचा विवाह नाईलाजास्तव करावे लागत आहे. या वेबसाईट
मध्ये सर्व समाजातील बांधवांची माहिती अद्ययावत असल्याने सर्व समाजबांधवाना याची जाणीव होईल. त्याचप्रमाणे आपण घरी बसुनच आपल्या परीवारीची संपुर्ण माहिती
अदययावत करू शकणार असुन नावे कमी जास्त करता येणार असुन त्यात आपल्या मुलींचा विवाह ज्या समाज परीवारात झाला असेल त्या परीवारात नाव समाविष्ट करता येईल व
आपल्या परीवारातील नाव कमी करता येईल तसेच समाजात होणारे वेगवेगळे कार्यक्रम व उपक्रम समाजाच्या वेबसाईटवर अदययावत करता येणार असल्याने समाजातील सर्व
बांधवांना घरी राहून देखील समाजातील माहिती प्राप्त करता येणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हि वेबसाईट तयार करताना समाज संस्थेस कोणत्याही प्रकाराची आर्थिक
झळ येवु दिलेली नाही. त्यामुळे प्रत्येक समाजबांधव आपल्या अॅनड्राइड मोबाईल मध्ये देखील हि वेबसाईड डाउनलोड करु शकणार आहे. आपल्या समाजाचा परीचय संपूर्ण जगात
झाला पाहिजे याचा संकल्प घेवुन आपला आशिर्वाद पाठीशी रहावा या विचाराशी समरस होवुन श्री. शुक्ल यर्जुवेदिय गोवर्धन ब्राम्हण मंडळ धुळे ची वेबसाईट समाजबांधवांना उपलब्ध
करत आहोत. ऐवढी इच्छा व्यक्त करून माझ्या प्रस्तावनेला पुर्णविराम देतो.
जयहिंद ! जय महाराष्ट्र !! जय समाज !!!
आपलाच
विजय नरहर पाठक (दिघावेकर)
सचिव - श्री शुक्ल यजुर्वेदिय गोवर्धन ब्राम्हण मंडळ धुळे
मो नं ७५८८३१९५१३, ९४२३४७४७५३