अध्यक्षांचे मनोगत
प्रिय समाज बंधु भगिनींनो,
श्री. शुक्ल यजुर्वेदिय गोवर्धन ब्राम्हण मंडळ धुळे, संस्थेच्या सन्माननीय सभासदांनी मला दिनांक २० मे २०१८ रोजी झालेल्या वार्षिक सर्वासाधरण सभेत आपण सर्वांनी मला
अध्यक्षीय पदावर सर्वानुमते निवडुन दिले, खरोखरच समाजाची धुरा माझ्या व कार्यकारीणी मंडळाच्या हातात दिल्याने मी आपल्या सर्व समाज बांधवाचा ऋणी आहे. आपण मला
अध्यक्ष पदावर स्थानापन्न केल्यानंतर माझी वैयक्तीक जबाबदारी नक्कीच वाढली होती. कारण संस्थेची स्थापना साधारणतः सन १९७८ रोजी करण्यात आली. त्यावेळ पासून
आपल्या समाजातील पंचवार्षिक निवडणुका हया नक्कीच होत गेल्या. प्रत्येक अध्यक्ष व कार्यकारीणी मंडळाने समजहिताकरीता योगदान दिलेले आहेच याबाबत मतभेद नसावा, परंतु
आपल्या निवडुन आलेल्या कार्यकारीणी मंडळाने ऑडिट अहवाल मा. धर्मदायुक्त कार्यालयात जमा करणे आवश्यक असते, त्यासंदर्भात मागील ०५ वर्षांचे ऑडिट रिपोर्ट
मा. धर्मदायुक्त कार्यालयात जमा नसल्यानं दंड भरुन आज वर्षाअखेर संपूर्ण दप्तर अद्ययावत करण्यात आले. समाजाला लाभलेल्या प्रत्येक अध्यक्ष व कार्यकारीणी मंडळाने समाज
एकत्रित कसा राहिल याचा प्रत्येकाने आपआपल्या परीने प्रयत्न केलेला आहेच, यामुळे आमच्या कार्यकारीणी मंडळाची निवड झाल्यानंतर आपल्या संस्थेच्या बँक खात्यात साधारणतः
रुपये ७० हजार शिल्लक रक्कम होती. यामुळे समाजातील कोणतेही काम करण्याकरीता आर्थिक मदतीची गरज महत्वाची असल्याने आम्ही असे ठरविले की, प्रत्येक वेळी समाज
बांधवांकडुनच देणगी का मागायची त्यापेक्षा आपल्या सर्वांना समाज बांधवांनी निवडुन दिले असल्याने आपले देखील आद्य कर्तव्य आहे की, आपण स्वतः समाजाला देखील देणे
लागतो. यामुळे सर्व कार्यकारीणी मंडळाने साधारणतः तीन लाख रुपये रक्कम समाज संस्थेस आपल्या घरातील स्वर्गवासी व्यक्तींच्या नावे देणगी देवुन एक वेगळाच पायंडा सुरू
कलेला आहे. त्याच प्रमाणे दर महिन्याला होणा-या कार्यकारीणी मंडळाच्या मासीक सभेत देखील प्रत्येक हजर सभासदाने आपआपल्या आर्थिक स्थिती नुसार गंगाजळी जमा करुन
समाज संस्थेस मदतच केली आहे. याप्रमाणे यापुढे येणा-या प्रत्येक नवीन कार्यकारीणीने अगोदर स्वतः समाज संस्थेस देणगी देण्याचे प्रयोजन करावे त्यानंतरच समाज बांधवांजवळ
व इतर मित्र परीवाराजवळ देणगी मागण्यात यावी जेणे करुन आपल्याला त्याचा नक्कीच अभिमान असणार आहे.
आपणांस सांगतांना आनंद तेवढंच दु:ख देखील होत आहे, कारण सन २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांत देशावर महामारीचं कोव्हीड १९ सारखे संकट आलेले असतांना देखील
आपल्या कार्यकारीणी मंडळाने साधारणतः १०५ समाज बांधवांच्या घरी साधारणत: रुपये ₹ २०००/- किराणा व ₹ ५००/- रोख देवून सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र
समाजातील बांधवांना मदतीची हाक दिली असता समाजातील तसंच मित्र परीवारातील बांधवांनी सहकार्याची भावना जोपासली असून समाजाच्या माध्यमातून अश्या प्रकारे कोव्हीड १९
सारख्या महामारीला देखील सर्वांनी तोंड देवून जगण्याची एक नवीन उमेद निर्माण केली. या प्रसंगी नक्कीच सांगावेसे वाटते की आपल्या समाज बांधवातील अनेक परीवारातील
सदस्यांना मृत्यु आल्यानं अनेक परीवारावर संकट ओढावले होते. याप्रसंगी कार्यकारीणी मंडळाने आणखी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून धूळे शहरातील फक्त आपल्या
शाखेतील समाजबांधवाच्या घरी कोणी व्यक्ती मृत्यु पावली असता पहिल्या दिवसाचे ५० व्यक्तीचे जेवण आपल्या समाजसंस्थेमार्फत पूर्णतः मोफत देण्यात येत आहे. या स्तुत्य
उपक्रमास अन्नपुर्णा योजना असे संबोधण्यात येत असून आपणांस अध्यक्ष या नात्याने विनंती करतो की, अनेक समाजातील दानशुर व्यक्तिंनी समाजाला आर्थीक मदत केलेली आहे,
परंतु आपणास कोणाला कायम स्वरुपी आपल्या परीवारातील व्यक्तीच्या नावे वरील अन्नपुर्णा याेजनेला मदत करावयाची असल्यास त्यानी सांगितलेल्या माणसाच्या नावे अन्नपुर्णा
योजना राबविण्यात येवून त्यांच्या नावे अन्नदान केले जाईल. यामुळे आपल्या समाजातील दानशूर व्यक्तींना आमची विनंती आहे कि, या योजनेकरीता सहकार्य करावे तसेच हि
योजना कायमस्वरुपी धूळे शहरात सुरू रहावी याकरीता आमच्या कार्यकारीणी मंडळाने समाज संस्थेच्या बँक ऑफ महाराष्ट्र जयहिंद कॉलेज शाखा येथे कायम स्वरुपी
रुपये ३,११,०००/- तीन लाख अकरा हजार रुपये ची मुदत ठेव पावती केली असून ती येणा-या नवीन कार्यकारीणी मंडळास तोडता येणार नसून कायमस्वरुपी धुळे शहरात
अन्नपुर्णा योजना राबविण्यात यावी हि यामागची भुमीका आहे.
समाज बांधवांना आपल्या समाजाचे एकमेव कार्यालय मनकर्णिका भवन असल्याने या भवनात सर्व सोय सुविधा होत्या परंतु स्वयंपाक गृह वेगळे नव्हते. त्यामुळे प्रवेश व्दाराजवळच
कायम स्वरुपी स्वयंपाक केला जात असे. या करीता बरेच समाज बांधव देखील मनकणिका भवन घेत नसत. यातून मार्ग काढण्याचे ठरविले असता आमच्या कार्यकारीणीने आपल्या
कार्यालयातील मागील भागात नाला असुन कार्यालयापासून ब-याच दूर अंतरावर असल्याने महानगरपालीकेची संरक्षण भिंत देखील बांधलेली होती. यात बरेच अंतर असल्यानं सर्वजण
मिळून निर्णय घेण्यात आला व आपल्या समाजाचे सिव्हिल इंजिनिअर श्री. सागर प्रमाद मूळे यांना बोलावुन त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी योग्य मार्गदर्शन केल्याने आपल्या
समाज संस्थेस मनकर्णिकाभवन च्या मागील बाजुन स्वतंत्र स्वयंपाक गृह तयार करण्यात येवुन तेथे नियोजनबध्द सर्व सोयी उपलब्ध करण्यात आल्याने मनकर्णिकाभवन योग्य
पध्दतीने बुकिंग होवु लागले, समाज संस्थेस त्याचा फायदा जाणवु लागल्याने समाज बांधवांना विनंती आहे की, आपण धुळे शहरात काही कार्यक्रम असल्यास आपल्या कार्यालयास
प्रथम प्राधान्य देण्यात यावे हि विनंती.
समाज बांधवांना सांगु इच्छितो की आपल्या समाजाचा अध्यक्ष होण्यापूर्वी मी स्वतः राजकिय क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात अनेक पदावर कार्य करीत असल्यानं
त्या कामाचा अनुभवाने समाजहितोपयोगी कशी काम करता येतील याचा नेहमीच विचार करीत आलो, हा विचार करत असतांना माझ्या सोबत असलेल्या प्रत्येक कार्यकारीणी
सदस्यांनी मला नेहमीच मदत करून सहकार्यच केले त्याबद्दल मी खरोखरच त्यांचा ऋणी आहेच, तसेच हे कामे करीत असतांना नोकरी सांभाळुन समाज कार्याला हातभार लावतांना
खरे तर तारेवरची कसरतच झाली पण हि कसरत करीत असतांना तेवढ्याच जोरात समाज वृध्दींगत करण्याकरीता मला माझ्या घरुन देखील अनमोल प्रतिसाद मिळाला कारण आम्ही
दोघेही नोकरी करत असल्याने कधी कधी घरी वेळ देता येत नसल्याने मला सांभाळुन घेतले त्याकरीता घरच्या मंडळींना खरोखरच त्याचे श्रेय देणे मी माझे कर्तव्यच समजतो.
कोणी काय केले यापेक्षा आपण काय करु शकतो यावर भर देत आल्याने मागील विषयांवर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता त्यांचा सन्मान राखून पुढील येणारा काळ समाजाकरीता
कसा चांगला राहिल किंवा आपला कार्यकाळ संपल्यावर येणा-या कार्यकारीणी मंडळाला कसे कार्यालयीन व्यवहार स्वच्छ व पारदर्शक राहिल याचे नियोजन आम्ही सर्व कार्यकारीणी
मंडळाने केला. त्यामुळे शासनाच्या नियमान्वये संपूर्ण ऑडिट अहवाल मा. धर्मदायुक्त कार्यालयात जमा करुन १२A चे देखील नियोजन नियमान्वये करण्यात आले आहे. त्यानुसार
सर्व व्यवहार होणे आवश्यक आहे. समाज संस्थाकोणा एकाची नसल्याने सर्वांनी समाजाचा सन्मान हा राखलाच पाहिजे. कारण असे म्हटले जाते. की समाजापेक्षा काेणीही मोठा
नसतो. यामुळेच समाजातील सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना माजी अध्यक्ष माजी कार्यकारीणी सदस्य तसेच समाजातील प्रतिष्ठित समाजबांधव यांना निमंत्रित करुन समाजातील घटकांना
न्यायच देण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या समाजातील महिला सदस्यांना देखील तेवढाच वाव देण्यात येत आहे जसे की, त्यांनी त्यांचे वर्षभराचे संपूर्ण कार्यक्रम मनकर्णिका भवन
येथे करण्यात यावे ज्यामुळे समाजातील महिलांना देखील समाज संस्थेच्या माध्यमातुन एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. त्यामुळेच आपल्या कार्यकारीणीतील महिला सदस्य तसेच
समाजातील महिला समिती मिळून अनेक प्रकारचे कार्यक्रम आपल्या संस्थेमार्फत घेण्यात येतात.
समाज संस्थेत अनेक प्रकारची मंडळी विविध क्षेत्रात उत्तुंग शिखरावर पोहचली आहेत, अश्या समाजबांधवांचा सन्मान करणे हे समाज संस्थेचे आदय कर्तव्यच असल्याने धुळे शहरातील
खासदार स. डॉ. श्री. सुभाष भामरे तसेच धुळे शहरातील प्रथम नागरीक म्हणजे धूळे महानगरपालिका धूळेचे महापौर श्री. प्रदिप कर्पे यांच्या हस्ते आपल्या समाजातील पाच सदस्यांना
समाजभूषण म्हणून सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ व बुके देवून सत्कार करण्यात आला, ज्यामुळे आपल्या इतर बांधवांनादेखील ओळख होवुन प्रोत्साहन मिळेल कि आपल्या समाजात
देखील अश्या प्रकारे प्रतिष्ठित समाज बांधव आहत. आपण देखील प्रयत्न केला पाहिजे. तसेच दरवर्षाप्रमाणे विद्यार्थी गुणगौरवाचा कार्यक्रम याप्रसंगी घेण्यात आला या कार्यक्रमास
UPSC परीक्षित उत्तीर्ण होवून फॉरेस्ट खात्यात वरीष्ठ अधिकारी म्हणून ज्यांची निवड झाली आहे असे श्री. विसपुते यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या मनोगतामधून आपल्या
समाजातील विदयार्थ्यांना चांगली प्रेरणा मिळेल हाच खरा हेतु होता.
श्री. शुक्ल यजुर्वेदिय गोवर्धन ब्राम्हण मंडळ धुळे ची वेबसाईट समाजबांधवांना उपलब्ध करता यावी एवढी इच्छा व्यक्त करुन माझ्या प्रस्तावनेला पुर्णविराम देतो.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय समाज !!!
आपलाच,
श्री. महेश सुभाष मुळे
(अध्यक्ष)
श्री शुक्ल यजुर्वेदिय गोवर्धन ब्राम्हण मंडळ, धुळे
मो. नं. ९२२६९३११५२